आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूरदर्शन आणि आकाशवाणी चा काळ आठवत असेल.
त्या वेळेस माहिती प्रसारणावर काही मूठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं नंतर काही मोठ्या कॉर्पोरेट news channel चं.
इंटरनेट आणि social media ह्या मुळे हे सगळं बदललं.
आता प्रत्येकाच्या हातात माहिती प्रसणार आलं आहे. आपण पॉडकास्ट, youtube, blog, फेसबुक पोस्ट, tweet अश्या कुठल्याही माध्यमातून घरी बसून माहिती प्रसारण करू शकतो.
पण निर्मिती सगळ्यांना करता येऊ लागली असेल तरी ह्याच्या फायद्यांपेक्षा धोके जास्त असतात, कारण एक fake news जगात कुठेही दंगली सुरु करू शकतात.
त्यामुळे निर्मिती करताना त्याच्या बरोबर येणाऱ्या responsibilities पण आपण जाणून घेतल्या पाहिजे.
social media चे फायदे आणि तोटे ; इतक्या वर्षात माहित प्रसारणात झालेले बदल ; online education, त्याचे फायदे, तोटे ; पॉडकास्ट चे भविष्य, अश्या
अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत डॉ उज्ज्वला बर्वे ह्यांच्याशी.
डॉ उज्ज्वला बर्वे ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या communication & Journalism विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांना विविध माध्यमातून काम करण्याचा अनेक दशकांचा अनुभव आहे, आणि ह्या क्षेत्रातला त्यांचं नावं खूप मोठं आहे.
त्यांचे स्वतःचे पण दोन पॉडकास्ट आहेत त्याची लिंक खाली दिली आहे
१) अनुस्वाद ( अनुवादित पुस्तकांवर आधारित पॉडकास्ट ) - https://open.spotify.com/show/1onyyMErK49kPzfHN1rANI?si=OEEApA7hSZqbuwRNNjVeZQ&dl_branch=1
२) माध्यम संशोधन संवाद ( communication & Journalism च्या विद्यार्थ्यांसाठी ) - https://open.spotify.com/show/1WrPHjNF6KgbKaTNdk98E5?si=y4Y4usMTQl2L8llkdBORNg&dl_branch=1
त्यांनी सांगितलेलं पुस्तक इथे विकत मिळेल - https://amzn.to/3pFIYZx
आमची website आहे - www.mipodcaster.com
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة