कचऱ्यातून रोजगार आणि उद्योगनिर्मिती - EP -५९ - Ft अमिता देशपांडे ( Amita Deshpande - reCharkha - The EcoSocial Tribe)
आपण जगात कुठेही गेलो तरी प्रत्येक शहराच्या बाहेर, इतकंच काय छोट्या गावांच्या ही बाहेर एक डम्पिंग यार्ड, म्हणजे तिथला कचरा डंप करण्याची जागा असतेच. ह्याला लँडफिलही म्हणतात. तुम्ही जर देवनार- मुंबई, उरुळी देवाची - पुणे, भांडेवाडी - नागपूर , मोशी - PCMC हि ठिकाणं ( किंवा इतर कुठलेही डम्पिंग यार्ड) बघितली असतील तर तुम्हाला लक्षात येईल की आपला कचरा डंप करायला किती मोठी जागा लागते.
असं म्हणतात सध्या भारतातल्या सगळ्या डम्पिंग यार्ड चे एकूण क्षेत्रफळ हे पुणे शहरा एवढे आहे, २०३० मध्ये ते बंगलोर शहरा एवढे आणि २०५० पर्यंत दिल्ली एवढे होणार आहेत.
आपल्या देशात जिथे जमिनीची किंमत खूप जास्त आहे, बहुसंख्य लोकांकडे स्वतःची जमीन नाही आहे, तिथे एवढ्या मोठ्या जागेचा वापर कचरा डंप करण्यासाठी आपण करतो आहे ह्याचा अर्थ आपलं काही तरी चुकतं आहे.
कचरा मुळात कमी तयार होणं आवश्यक आहेच, आणि त्यासाठी काय बदल करावे लागतील ह्या बद्दल आपण ह्या भागात चर्चा केली आहेच, पण त्याच बरोबर कचरा कमी करूनही उरलेला कचरा, कसा रोजगारनिर्मिती करून देऊ शकतो आणि अमिता देशपांडे हिने, कचऱ्यातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि wealth creation कशी होऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरणं तिच्या recharkha ह्या उपक्रमातून कसं घालून दिलं आहे ह्या बद्दलही गप्पा केल्या आहेत.
REcharkha - https://www.recharkha.org
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/recharkha_ecosocial/
YouTube - https://youtube.com/@myecosocialplanetrecharkha8692?si=Ut8mZPdAlT-ogqDp
ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة