इन्स्पिरेशन कट्टा
भाग -४५ प्रिया बोडके नवीन पिढीतली शेतकरी
खाणारे तोंड वाढतात आहे त्या बरोबर पिकवणारे हात पण वाढायला हवे
शेतकरी म्हंटलं की माझ्या सारख्या शहरी माणसासमोर दोन परस्परविरोधी चित्र उभे राहतात.
एक म्हणजे शेतकरी आत्महत्या आणि दुसरं म्हणजे शहरालगतच्या आपल्या जागा विकून मोठाल्या गाड्यांतून फिरणारे माणसं.
शेतकऱ्याला कधी व्यवहार कळलाच नाही, उत्पादन खर्च किती ? आणि त्या नुसार विक्री किमंत किती हे बघण्यापेक्षा दलाल जो भाव देईल तो घ्यायचा आणि मग फायदा - नुकसान काहीही न कळता नुसती मजुरी करायची आणि मग त्यातून नैराश्य येऊन शेती विकायची किंव्हा आत्महत्या करे पर्यंत जावं हेच २०२२ मध्ये पण चालू आहे.
हे सगळं असं असल्यामुळे पुढची पिढी ४-५ हजाराची नौकरी करणार पण शेती करणार नाही.
पण एक अल्पभूधारक शेतकरी, अगदी छान काम करून, शहरी मध्यमवर्गीयांसारखं सन्मानजनक आयुष्य जगू शकतो, हे ज्ञानेश्वर बोडके ह्यांनी त्यांच्या अभिनव फार्मर्स क्लब ह्याच्या माध्यमातून करून दाखवलं आहे.
त्यांच्या बरोबरीने आता त्यांची पुढची पिढी ह्या मिशन मध्ये काम करते आहे. विशेष म्हणजे मुलगा प्रमोद ह्याच्या सोबत त्यांची मुलगी प्रिया हि पण एक शेतकरी आणि अभिनव फार्मर्स क्लब ची एक प्रमुख मेंबर म्हणून काम करते आहे.
एक आधुनिक शिक्षित मुलगी हि शेतकरी म्हणून काम करणं हे विलक्षण आहे.
आज तिच्याशी इन्स्पिरेशन कट्टा च्या ४५ व्या भागात आपण अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत.
१) प्रियाने शेती हा व्यवसाय म्हणून का निवडला
२) शेतकऱ्यांची सद्य स्थिती
३) अभिनव ग्रुपचं नेमकं काम
४) त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला फायदा
५) शेती कोण करू शकतो, त्या साठी लागणारं शिक्षण
अश्या अनेक विषयांवर गप्पा आपण आज केल्या आहेत
App link - https://www.abhinavfarmers.club/
Website link - http://www.abhinavfarmersclub.com/
Our email id. - inspiration.katta@gmail.com
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة