भारतात साधारण 30 कोटी लोकं youtube बघतात.. म्हणजे अमेरिकेच्या जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येच्या बरोबरीचे youtube बघणारे लोक भारतात आहेत.. आणि jio आल्यावर ही संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे..
मग एवढे लोक जिथे असतात तिथे त्याची स्वतंत्र economy तयार होणं हे स्वाभाविक आहे..
पण ही स्वतंत्र economy जरी असली आणि खूप fame आणि पैसे कमावण्याची इथे संधी असली तरी, ते अगदी झटपट कमावता येतात अशी अनेक लोकांची धारणा झाली आहे..
मग नक्की तथ्य काय आहे? खरच इतका scope इथे आहे का? त्या साठी काय करावं लागतं? सातत्याने कामं करण किती महत्त्वाचे असतं? Patiance किती आवश्यक आहे? ह्या आणि अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अभिनेत्री ते youtube star असा प्रवास करणाऱ्या उर्मिला निंबाळकर हिच्याशी इन्स्पिरेशन कट्टा च्या 31व्या भागात
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة