" कॉलेजात एकत्र असलेल्या तीन मैत्रिणी , मनोरमा , कीर्ती आणि दमयंती! शेवटच्या वर्षाला झालेल्या फुटकळ भांडणातून त्यांच्यात आलेला अबोला आणि त्यानंतर आयुष्यभरासाठी झालेली ताटातूट! तब्बल अठरा वर्षांनी रमा आणि दमयंती या दोघींची घडलेली भेट आणि त्यांनी घेतलेला कीर्तीचा शोध! या शोधात कीर्तीच्या आयुष्यातल्या एका मोठ्या रहस्याचा झालेला उलगडा म्हणजे तीन कटिंग! ही कथा फक्त मैत्रीची नाही तर माणसाच्या मनाची आहे. निसटून गेलेल्या सोनेरी दिवसांची आणि सोबतच हळव्या प्रेमाचीही आहे. तीन मैत्रीणीचं भावविश्व, त्यांचं प्रेम, पझेशन, असुरक्षितता आणि त्यांची या सर्वांना स्वीकारून पुन्हा एकत्र येण्याची धडपड म्हणजे तीन कटिंग!
माणसाच्या आयुष्यातले अपरिहार्य स्वीकार, होकार आणि नकार ... म्हणजे तीन कटिंग! "
الوسوم
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة
