Ajatshatru S02E01 Sumedhkumar Ingale
सम्राट अजातशत्रूने भारतवर्षात आपलं साम्राज्य तयार केलं. ‘मगध’! पण, वीस वर्षांनी एका भेसूर-विद्रूप चेहऱ्याच्या बाळाचा जन्म झालाय. वैशाली राज्यात जन्म झालेलं हे बाळ जेवढे दिवस आयुष्य जगेल, सम्राटाच्या आयुष्यातील तेवढी वर्षे कमी होत जातील. अजातशत्रू आणि मागधी फौज त्या बाळाचा खून करू शकतील का? कि वेळ टळून जाईल आणि अजातशत्रूला प्राणांना मुकावं लागेल? आणि बाळ जन्म झालेल्या राज्याचं, वैशालीच्या लोकशाहीचं काय होईल? अजातशत्रूच्या युद्धमोहिमेत बेचिराख होणाऱ्या एका लोकशाहीची आणि राष्ट्रासाठी प्राणत्याग करणाऱ्या सर्वसामान्य सैनिकांची महाकथा..
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة