Shambhu Nitin Thorat
Step into an infinite world of stories
Non-Fiction
बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन् आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही. मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते. ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे, असे म्हणून हात झटकणे ही शुद्ध आत्मवंचना आहे. महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिका तुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत. पण तेवढे पुरेसे नाही. कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्रात ‘राजमाता जिजाऊ मिशन’ यासाठी भरीव काम करत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतून कुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा.
Release date
Ebook: 1 October 2021
English
India
