18 Ratings
4.61
Language
Marathi
Category
Biographies
Length
1T 48min

Bharatiya Genius Meghanad Saha

Author: Achyut Godbole, Deepa Deshmukh Narrator: Swaroopa Phadke Audiobook

सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९१०-९५) ह्यांनी लिहून ठेवले आहे की, “भारतातील खगोलशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील मेघनाद साहा ह्यांचे स्थान अद्वितीय आहे.” साहा ह्यांचा औष्णिक मूलकीकरणाचा (थर्मल आयोनायझेशन) सिद्धांत, म्हणजे विसाव्या शतकातील जागतिक विज्ञानास भारताने दिलेले सर्वात महत्वाचे योगदान आहे. अवकाशीय वर्णपटाचे मूळ, ह्या सिद्धांताने स्पष्ट केले. त्या काळातील तो एक लक्षणीय शोध होता. एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामध्ये तार्‍यांबाबत लिहित असता, ऑर्थर स्टॅन्ले एड्डिंग्टन असे वर्णन करतात की, औष्णिक मूलकीकरणाचा सिद्धांत म्हणजे, साहा ह्यांनी पहिल्या चल तार्‍याचा -मिरा सेटीचा- शोध लावल्यापासून भौतिकशास्त्राच्या निरनिराळ्या शाखांत झालेल्या, सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांतील बाराव्या क्रमांकाचा महत्त्वाचा टप्पा होय. मुळात १९३१ साली प्रकाशित झालेल्या, ’ए टेक्स्टबुक ऑन हीट’ ह्या विख्यात पाठ्यपुस्तकाची, साहा ह्यांनी (बी.एन.श्रीवास्तव ह्यांच्या साथीने) ’ट्रिटीज ऑन हीट’ ह्या नावाने नवीन आवृत्ती लिहीली. देशात पहिल्यांदा अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्राचे शिक्षण व प्रशिक्षण सुरू करणारेही साहाच होते. देशातील पहिला आवर्तनक (सायक्लॉट्रॉन) साहा ह्यांच्या पुढाकारानेच उभारला गेला होता. साहा हे थोर संस्था-संघटक होते. त्यांनी उभारलेल्या संस्थांत; भारतातील नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद; इंडियन फिजिकल सोसायटी, कोलकाता; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया (जिचे पुढे जाऊन, इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमी असे नामकरण करण्यात आलेले होते), नवी दिल्ली; इंडियन सायन्स न्यूज असोसिएशन, कोलकाता; आणि साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, कोलकाता; ह्यांचा समावेश होतो. इंडियन नॅशनल काँग्रेसने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे साहा हे सक्रिय सदस्य होते. ह्या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने १९५२ मध्ये स्थापन केलेल्या, भारतीय दिनदर्शिका सुधार समिती (इंडियन कॅलेंडर रिफॉर्म कमिटी) चे, साहा अध्यक्ष होते. भारतीय संसदेचे ते निर्वाचित स्वतंत्र सदस्य होते. सामाजिक विकासाकरता मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरणाचे ते समर्थन करत असत.

© 2020 Storyside IN (Audiobook)

Explore more of