श्रावण म्हटले की, कहाणी वाचणारी आई डोळ्यासमोर येते. पूर्वी लिहिल्या गेलेल्या या कहाण्या म्हणजे मराठी साहित्यातील एक अनमोल देणगीच! पण आताशा कालानुरूप काही शब्द, काही संदर्भ, कालबाह्य झाले आहेत, जे नैसर्गिक आहे. म्हणून मग, कहाण्यांच्या आत्म्याला कोणताही धक्का न पोहोचविता आधुनिक काळाशी त्याची सांगड घालून नव्या जुन्याचा मेळ साधत, या कहाण्या आपल्यापर्यंत पोहोचिण्याचा हा छोटासा प्रयत्न! आजच्या समाजातील मानवी नातेसंबध, पर्यावरण, अर्थकारण, स्त्री विषयक दृष्टीकोन, यांचे विविध पैलू या कहाण्यांमधून उलगडण्यात येतात. कधी रूपकाचा आधार घेत, तर कधी वास्तवाचे दर्शन घडवत मानवी जीवनाला आकार देणाऱ्या मूल्यांचा यात विचार करण्यात आला आहे, मात्र तेही कोणता अविर्भाव न ठेवता! तेव्हा सहज, सोप्या भाषेतील या कहाण्यावजा जीवन कथा नक्की ऐका.
Step into an infinite world of stories
English
International