महानंदा ! दक्षिण रत्नागिरी आणि गोमंतक या भागांतल्या देवळांभोवती देवदासींची किंवा भाविणींची संस्था अगदी कालपरवापर्यंत अस्तित्वात होती, अजूनही तिचे जुनाट अवशेष दिसत असले, तरी ती संस्था आता सुदैवाने नामशेष झाली आहे. परंतु ती संस्था होती, अस्तंगत होत होती त्या काळातली ही कथा आहे. सामाजिक बंधनांत जखडून गेलेल्या दोन जिवांची ही हुरहूर लावणारी प्रेमकथा ! या कथेत नाट्य आहे, पण नाटक नाही. हळवे प्रेम आहे, पण भाबडेपण नाही. किंबहुना ही प्रेमकथा असली, तरी ती एका ‘जुगारा’चीच चटका लावणारी कथा आहे, असे म्हणावे लागेल !
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789352846016
Release date
Audiobook: 18 March 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 816 ratings
Heartwarming
Sad
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 816
Sanket
4 Jun 2020
नमस्कार परी mam,storytel वर तुमच्या आवाजात महानंदा ही कथा ऐकली.. आणि शेवट ऐकुन अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. ज्याप्रमाणे तुम्ही कथा सांगितली.. त्यात पूर्णपणे हरवून गेलो.. प्रत्येक पात्र अगदी वेगळं जाणवलं.. महानंदा च जत्रेमधील केलेलं वर्णन.. मामीचा स्वभाव.. मामांच बोलणं.. आणि स्वतः बाबुल.. ज्या तऱ्हेने तुम्ही कथा सांगत होता ते ऐकुन संपूर्ण चित्र डोळ्यासमोर दिसत होतं.. एखाद्या चित्रपटाप्रमाणे.. इतकी सुंदर कथा इतक्या आपुलकीने सांगितल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो..शेवटी एक वाईट वाटलं.. बाबुलने महानंदाला हट्टाने सोबत न्यायला हवं होतं.. शेवट मात्र मनाला रुख रूख लावून गेला.. अर्थात ते लेखकाच्या हातात होतं.. पुन्हा एकदा धन्यवाद!!!
Siddharth
28 Jun 2022
जयवंत दळवी यांची अप्रतिम कलाकृती👌 विविध पात्र त्यांचे स्वभाव विशेष आणि त्यांची विचारांची वादळं...सगळं छान डोळ्यासमोर उभं राहतं.,,एक उत्कट प्रेम कहाणी...देवदासची आठवण व्हावी अशी...त्यावेळचा समाज...वर्ग व्यवस्था...दासी प्रथा...या वेळेच्या पार्श्वभूमीवर बाबुलनाथ आणि महानंदेचं बहरणारं प्रेम...वाटेवरील विविध धक्कादायक वळणं...प्रवाहपतित होऊन जगणं...व्यथित करून जाणारं अश्यातच दमयंती एक आशेचा किरण म्हणावा कि काय "...जीवाला रुखरुख लावून शेवट...परी तेलंग यांच्या आवाजानं गोष्टीत जीव ओतला आहे..त्यासाठीं त्यांचे कौतुक आणि आभार🙏
नंदिनी
5 Nov 2020
खूप छान. शेवट मनाला भिडणारा.
Manisha
2 Dec 2021
Jaywant Dalvi All-time Great Pari Telang' voice is so touchy all characters become live
renuka
28 Jul 2022
शब्दच नाहीत. जयवंत दळवी तर महान आहेतच. त्यांच्या आघवत्या वर्णनात्मक लेखनशैली शेवटपर्यंत खिळवून नाही ठेवले तर तुम्हाला दळवी कळेलच नाहीत असं समजा.
Arvind
29 Dec 2022
खूप छान
Rajesh Jamkar
1 May 2022
अप्रतिम
Yogi
17 Feb 2021
Awesome ......
hari
4 Jul 2023
Nice
Dipak
1 Jan 2024
Amazing
English
India