भारताच्या दक्षिणेला स्थित, महिलारोप्य नावाच्या शहराबाहेर भगवान शंकराचा एक मठ होता, जिथे ताम्रचूड नावाचा एक भिक्षू शहरातून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे.त्याचं अर्ध पोट भिक्षेने भरायचं आणि अर्ध अन्न तो पोटलीमध्ये बांधून खुंटीला टांगायचा. ती अर्धी भिक्षा तो त्या मठातील सफाई कर्मचाऱ्यांना पगार म्हणून वाटायचा. अशा प्रकारे त्या मठाची देखभाल चांगली चालली होती.
एके दिवशी मठाच्या आसपास राहणारे उंदीर हिरण्यक नावाच्या उंदराला म्हणाले, “आम्ही आमची भूक भागवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो, आणि स्वादिष्ट अन्न तिथे खुंटीवर टांगलेल्या पोटलीमध्ये बांधलेले असते. प्रयत्न करूनही आम्ही त्या खुंटी पर्यंत पोहोचू शकत नाही. तू आम्हाला काही मदत का करत नाहीस?"
आपल्या साथीदारांचं म्हणणं ऐकून हिरण्यक त्यांच्यासह मठात पोहोचला. त्याने उंच उडी घेतली. पोटलीमध्ये ठेवलेलं अन्न त्याने स्वतः खाल्लं आणि आपल्या साथीदारांनाही खाऊ घातलं. आता हे चक्र रोज सुरू झालं. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्याने मठात काम करणं बंद केलं. या सगळ्या प्रकारामुळे संन्यासी खुप नाराज झाला Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India