ढोलताशा पथक हे पुण्याच्याच नव्हे एक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीतील एक अविभाज्य अंग आहे. विशेषतः गणेशोत्सवातील ढोलताशांचा निनाद हा सर्वांनाच भुरळ घालतो. अशा ढोलताशा पथकांमध्ये महिलावर्गाचाही फार मोठा सहभाग असतो. या महिलावर्गाचा विशेषतः पथकांचे नेतृत्व करणाऱ्या महिलांचे जग काय असते, त्यांच्यापुढची आव्हाने काय असतात, त्यावर त्या कशी मात करतात, त्यांचे अनुभव काय आहेत...याबाबतचा त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोच असे नाही. म्हणूनच, त्यांचे प्रतिनिधी म्हणून पुण्यातील अग्नि या ढोलताशा पथकाच्या मनिषा गोसावी आणि गायत्री शिरोडकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद ढोलताशांमधील महिलांचा हा आवाज उलगडून दाखवतो.
हा एपिसोड यूट्यूबवर पाहायचा असेल तर पुढील लिंकवर क्लिक करा- https://youtu.be/TbvFdxPkYzw
Step into an infinite world of stories
English
India