Step into an infinite world of stories
3.8
Biographies
अड्यारच्या समुद्र किनार्यावर थिऑसफिकल सोसायटीच्या उच्चाधिकारी लेडबीटर यांनी जेव्हा लहानग्या कृष्णाला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्याच्या भोवतीचं अद्भुत वलय पाहून ते थक्कच झाले. कारण यापूर्वी त्यांनी इतकं दिव्य वलय कधीही पाहिलेलं नव्हतं. पुढे जाऊन त्यांनी जेव्हा अशी घोषणा केली की, ‘हा मुलगा भविष्यात खूप थोर मनुष्य होणार आहे. इतकंच नव्हे, तर तो जगद्गुरु होईल.’ हे ऐकताच कृष्णाला अभ्यासात मदत करणार्या वुडला धक्काच बसला. कारण त्यांच्या मते कृष्णा हा विशेष मठ्ठ मुलगा होता. हेच लेडबीटर, पुढे 1929 साली जे. कृष्णमूर्तींनी थिऑसफिकल सोसायटीचा त्याग करून जगद्गुरु बनायचे नाकारले तेव्हा म्हणाले की, ‘जगद्गुरुंचं आगमन चुकलेलं आहे!’ 1925 च्या नोव्हेंबर महिन्यात कृष्णाच्या प्राणप्रिय नित्याला, त्याच्या धाकट्या भावाला जेव्हा काळ घेऊन गेला, महात्म्यांनी दिलेले शब्द त्यांनी पाळले नाहीत आणि कृष्णाचं संपूर्ण जगच उध्वस्त झालं...या दु:खातून वर येऊन तो असा काही निडरपणानं काळाच्या डोळ्याला डोळा भिडवून उभा राहिला की, काळ त्यालाच घाबरला. त्यानंतर ज्या जे. कृष्णमूर्तीचा जन्म झाला, आणि त्यानं अशी काही बंडखोरी केली की नजर उचलून त्याच्याकडे पाहण्याची त्या महाभयंकर कळिकाळाचीही हिंमत झाली नाही. इतकी मोठी महाबलाढ्य थिऑसफिकल सोसायटी, त्यांचे महात्मे आणि महानुभाव, त्यांचं तत्वज्ञान, जगभर पसरलेले त्यांचे हजारो अनुयायी...सगळं सगळं झुगारून लावलं त्यानं क्षणात...कुणीही, अगदी कुणीही त्याचा केसही वाकडा करू शकले नाहीत. आता तो फिनिक्स होऊन जगणार होता. राखेतून पुन:पुन्हा जन्म घेऊन झेपावत राहण्याची ताकद आता त्याच्या पंखात आलेली होती. कृष्णा आंतर्बाह्य बदलला होता. त्याच्यात प्रचंड शक्ती आली होती. ज्या बाह्य जगात नित्याचा शरीरासह वावर असणार नव्हता, त्या जगाला टक्कर द्यायची त्याच्यात जबर्दस्त ताकद आलेली होती. आता तो जगणार होता तो फक्त एकाच ध्येयासाठी : ‘अखिल मानव जातीला सर्व प्रकारच्या भयांमधून कायमचं आणि संपूर्ण मुक्त करणे!’
Release date
Audiobook: 2 March 2018

English
India