२७ नोव्हेंबर म्हणजे `स्टोरीटेल इंडिया`चा वर्धापनदिन. हा सहावा वर्धापनदिन एका वेगळ्या उपक्रमातून साजरा झाला. तो होता, रसिकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांची अमृतजयंती साजरी करताना, एका राज्यस्तरीय कादंबरीलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे विजेते ठरले ते चेन्नईत राहणारे मराठी साहित्यिक रवींद्र भयवाल. त्यांची `मिशन गोल्डन कॅटस्` ही कादंबरी नेमकी काय आहे, ती साकारताना त्यांचे अनुभव काय आहेत, एकूणच ही स्पर्धा आणि तिची आयोजक आणि लेखक या दोन्ही बाजूंची प्रक्रिया कशी होती, या कादंबरीचे कथासूत्र काय या व अशा अनेक बाबींची उलगड करणारा एक उत्स्फूर्त अन् मुक्त संवाद स्टोरीटेल कट्ट्यावर रंगला, तो रवींद्र भयवाल, सम्राट शिरवळकर आणि संतोष देशपांडे यांच्यात. तोच आहे हा स्पेशल स्टोरीटेल कट्टा. रसिकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांची स्मृती जागवतानाच, नवी काही पेरणी करण्याच्या प्रयत्नाचा हा आगळा उपक्रम...त्याविषयी जरुर ऐका.
`मिशन गोल्डन कॅटस्` ही कादंबरी `स्टोरीटेल` वर ऐकण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/mission-golden-cats-2726436 `स्टोरीटेल` चे सभासद होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India