`स्टोरीटेल`ने नुकतीच भारतातील आपली सहा वर्षे पूर्ण केली. या सहा वर्षांचा मागोवा घेता, `स्टोरीटेल`ने भारतीय, विशेषतः मराठी रसिकांना काय दिलं, याचा लेखाजोखा मांडला आहे, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी. श्राव्य पुस्तकांची म्हणजेच ऑडिओबुक्सची सवय आता मराठी वाचकांना लागली आहे, या पार्श्वभूमीवर, आपल्याकडे हे क्षेत्र कितपत रुजले आहे, पॉडकास्टिंगमध्ये `स्टोरीटेल कट्टा` कसा लोकप्रिय ठरला, `स्टोरीटेल`चे विस्तारधोरण बदलले आहे का या व अशा अनेक प्रश्नांची स्पष्ट शब्दांत उत्तरे यातून आपणास मिळतात. जरुर ऐकावा असा हा पॉडकास्ट. स्टोरीटेल ने नुकतेच रिलीज केलेल्या सुहास शिरवळकर यांच्या `अस्तित्व` या कादबंरीला ऐकण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://www.storytel.com/in/books/astitva-2726435 स्टोरीटेलचे वर्गणीदार होण्यासाठी क्लिक करा- https://www.storytel.com/in#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India