सध्या ‘मावळा’ या बोर्डगेमची सर्वत्र चर्चा आहे. मराठीतील एकमेव ऐतिहासिक असा हा बोर्डगेम कसा साकारला गेला, या गेमची संकल्पना काय, हा गेम कसा खेळावा या सर्व गोष्टींची माहिती दिली आहे निती इन्फोटन्मेंटचे सहसंस्थापक अनिरूद्ध राजदेरकर यांनी... ‘मावळा द बोर्ड गेम’चे वैशिष्ट्य म्हणजे या गेममध्ये एकमेकांविरूद्ध न खेळता, सोबत हा गेम खेळावा लागतो. स्वराज्याचा संपूर्ण प्रवास या गेममध्ये मांडण्यात आलेला आहे. फासे टाकून खेळताना काही आनंदाचे क्षण येतात, काही संकटाच्या मालिका येतात, होन मिळतात व अखेरीस शिवाजी महाराजांच्या पायाशी हे होन एकत्रपणे अर्पण करायचे अशी ही गेमची प्रक्रिया आहे. राजदरेकर यांच्याशी संवाद साधला आहे स्टोरीटेलचे प्रसाद मिरासदार यांनी...
'मावळा - द बोर्ड गेम' विकत घ्या आणि मिळवा तीन महिन्याचं स्टोरीटेलचं सबप्शस्क्रिप्शन!
या पॉडकास्टच्या पूर्वार्धात ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात श्रोत्यांसाठी कोणती आकर्षणं आहेत, संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांच्याकडून.
Step into an infinite world of stories
English
India