Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन सिझन ची सुरुवात नाविन्यपूर्ण एपिसोड ने करावी असं ठरवलं होतं !! गोष्टी ऐकून , वाचून आणि त्यातली चित्र बघून मुलं खूप काही शिकतात पण ते करण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त करता येईल? यावर एक एपिसोड करून पालकांना कशी मदत करता येईल याचा शोध घेता घेता एका अफलातून मुलीशी ओळख आणि मग मस्त मैत्री झाली !! मानसी महाजन !!! जिज्ञासा किड्स या संस्थेची founder आणि सगळ्यात छान ओळख म्हणजे "गोष्ट सांगणारी ताई" तिच्या 'जिज्ञासा किड्स' या संस्थेमधून मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देण्याचे काम ती करते. मुलांसाठी ती रीडिंग क्लब चालवते, आणि ज्या मुलांना पुस्तके मिळू शकत नाहीत, अशा मुलांसाठी मानसी "पुस्तक खिडकी" नावाचे इ-मॅगझीन चालवते. लॉकडाऊन मध्ये मुलांना उत्तम गोष्टी ऐकता याव्यात यासाठी तिने 'कथा कविता खजाना' नावाचा Youtube चॅनेल सुरु केला आहे. पपेट शो च्या मध्यमातून गोष्टी सांगणे आणि वेगवेगळे कल्पक पपेट तयार करण्याची ती कार्यशाळा सुध्दा ती घेते. खरंतर आणखी ही बरंच काही आहे तिच्याबद्दल सांगण्यासारखं पण मला वाटतं आपण ते तिच्याकडूनच ऐकूया आपल्या आजच्या भागात !! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India