मुलांना 'समजून' घेणं म्हणजे नेमकं काय ? त्यांचं नैसर्गिक वर्तन समजून घेऊन कसा बदल केला तर मूल आणि आपण छान आनंदी राहू शकतो ? फक्त IQ नाही तर EQ सुद्धा का महत्वाचा असतो मुलांच्या सर्वांगीण विकासात ? पालक आणि शिक्षक यांनी भावनिक साक्षर असणं का गरजेचं आहे ? मुलांशी वागता बोलताना त्यांच्या आणि आपल्या भावनांचा स्विकार करणं का गरजेचं आहे ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी घेऊन आली आहे ; Parenting coach आणि En-reach foundation चे संस्थापक डॉ.दिनेश नेहेते सरांना !!! नेहेते सर त्यांच्या या फौंडेशन च्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत .शिक्षक आणि पालक यांना उत्तम पिढी घडवण्यासाठी सक्षम करण्याचं काम En-reach Foundation करते. त्यांच्या या कामाचा फायदा आजवर जवळजवळ १८००० पालक , ३५०० मुलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास ४५ शाळांना झालाय !!! मानसशास्त्रातील अनेक अभ्यासक्रम पूर्ण करून; कॉर्पोरेट क्षेत्रातील करियर sacrifice करून, ते सध्या त्यांच्या संस्थेमार्फत parenting coach आणि counselor म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या गाढ्या अनुभवाचा फायदा तुम्हा सगळ्यांना नक्कीच होईल या आशेने आणि खात्रीने आज त्यांना आपल्या या पॉडकास्टवर आमंत्रित केलंय. बाकी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आता त्यांच्याचकडून ऐकूया आजच्या Experience "Enriched" Parenting या एपिसोड मध्ये !!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India
