पालकत्वाचा प्रवास हा एखादं जोडपं आईबाबा होणार हे कळल्यावरच सुरु होतो आणि हाच विचार मनात ठेऊन would be parent चा interview घ्यायचा असं मनात होतं . त्यासाठी जेव्हा सावनी ला विचारलं तेव्हा तिने क्षणात होकार दिला !! मला वाटतं हिच positive parenting ची सुरुवात आहे .आज एका कलाकार आणि "would be parent " ला तुम्हा सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलेय . नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात जिला सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिका म्हणून सन्मानित करण्यात आलं आणि आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमातून तिच्या सुरेल आणि सुंदर स्वराविष्कारांतून आनंद देणारी, अतिशय गोड आवाजाची आणि तितक्याच गोड स्वभावाची आपली सगळ्यांची आवडती गायिका " सावनी रवींद्र " !!! तिचा एक प्रतिथयश गायिका म्हणून सुरु असलेला यशस्वी प्रवास आपण पाहतोच आहोत पण आता ती वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्या प्रवासाचीही सुरुवात करतीये... आईपणाची !! आज एक वेगळी सावनी सापडणार आहे आपल्याला या मुलाखतीतून ... चला तर मग जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी तिच्याकडून आपल्या selfless parenting या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात !!! Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India