असं म्हणतात, "handwriting is an image of your personality"!! खरं तर हे वाक्य जेव्हा वाचनात आलं तेव्हा त्याचा नीटसा context माहिती नव्हता पण जेव्हा "ग्रॅफॉलॉजि " या क्षेत्राविषयी कळालं तेव्हा त्यातला गर्भितार्थ लक्षात आला. एखाद्याच्या हस्ताक्षर, सही किंवा कागदावर व्यक्त होण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल , व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या विचारसरणी विषयी बऱ्याच गोष्टी कळू शकतात , त्याचा अभ्यास करून त्यावर काम करता येऊ शकतं आणि आणखीनही खूप कंगोरे उलगडता येतात . किती वेगळं आणि विशेष आहे हे शास्त्र , नाही का? त्याचा सगळ्यात जास्ती उपयोग कोणाला होऊ शकतो तर तो मुलांना आणि त्यायोगे पालकांना !!! खास या विषयात करियर केलेल्या, त्यातल्या अनेक शाखांचा सखोल अभ्यास करून त्यामाध्यमातून या आगळ्यावेगळ्या क्षेत्राची लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने स्वतःची एक संस्था सुरु करणाऱ्या एका dynamic आणि enthusiastic ग्रॅफोलॉजीस्ट आणि handwriting expert ला आज मी घेऊन आलेय !!! Srujan graphological solutions & coaching centre चा founder, आदित्य ओक !!! आदित्य प्रोफेशनल ग्रॅफोलॉजीस्ट आणि questioned documents analyst म्हणून गेली अनेक वर्ष काम करतोय; त्याने स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या मॉड्युल्स च्या आधारे तो personality profiling consultation सुद्धा करतो ज्याचा उपयोग करियर गायडन्स , कॉर्पोरेट रिक्रुटमेंट , स्पोर्ट्स स्पेसिफिक अससेसमेंट अशा अनेक बाबतीत होऊ शकतो !! आहे ना खूपच इंटरेस्टिंग ...चला तर मग जाणून घेऊया या हटके पण खूप insightful आणि अर्थात मुलांना जाणून -समजून घेण्याचा वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या क्षेत्राविषयी आदित्याकडून. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India
