कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर, युधिष्ठिर हस्तिनापुरीचा राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ अत्यंत संस्मर्णीय आणि व्यापक स्वरूपाचा झाला ज्याची किर्ति चारी दिशांना पसरली. यज्ञ वैदिक अनुष्ठाना नुसार विद्वान ब्राम्हणांच्या मार्गदर्शनात पार पडला आणि दानधर्मही त्याच तोडीने केला गेला जसा आजवर विश्वात कुणीही पहिला नसेल.
यज्ञाच्या शेवटी एक मुंगूस तिथे आले. ज्याच्या शरीराचा अर्धा भाग सोनेरी होता आणि अर्धा तपकिरी रंगाचा होता. मुंगूस तिथे येताच जमिनीवर पसरले आणि जोरजोरात आवाज करू लागले.
त्याने तिथे असलेल्या सगळ्या ब्राम्हणांचे लक्ष आपल्याकडे खेचले आणि त्यासोबतच त्याने माणसाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मुंगूस म्हणाले, "धर्मराज! हे दिलेलं दान एका गरीब ब्राम्हणाकडून दिल्या गेलेल्या एक किलो पिठाच्या तुलनेत काहीच नाहीये." Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India