ठेविले अनंते तैसेचि राहावे.. जे आहे त्यात सुखी असं जे वागतात आहे ना आणि ज्यांना आजच्या काळात खरंच, मनापासून असं वाटतं आहे ना, त्यांना माझा सलाम.
आजच्या aspirational जगात आपल्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काही तरी वेगळं, चांगलं करायची इच्छा होत असते.
पण जास्तीत जास्त लोकांची हि इच्छा मनात किंवा बोलण्यातच राहते, ती कृतीत उतरत नाही. ह्याचं कारण म्हणजे कृती करणं सोपं नसतं, त्या साठी आपल्या comfort zone च्या बाहेर पडावं लागतं, मेहेनत करावी लागते आणि थोडी रिस्क पण घ्यायला लागते.
सौमित्र पोटे आणि निरंजन मेढेकर हे दोघे माझे सह पॉडकास्टर आणि मराठी पॉडकास्टर ग्रुपचे सदस्य आहेच त्याच बरोबर माझे मित्र पण आहेत. ह्या दोघांमधला कॉमन दुआ म्हणजे, हे दोघेही mainstream media मधले मोठे ब्रँड सोडून नवीन माध्यमांकडे वळले. कसा होता हा प्रवास, comfort zone सोडायला काय लागतं ? पॉडकास्ट आणि नवीन मीडिया माध्यमांचे फायदे अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत आजच्या ह्या भागात.
सौमित्र पोटे चा मित्रम्हणे हा पॉडकास्ट सध्या खूप गाजतो आहे, तर निरंजन हा एक उत्तम कादंबरीकार बनला आहे, त्याचे पुस्तक स्टोरीटेल आणि पुस्तकं स्वरूपात उपलब्ध आहेत, त्याच बरोबर मराठी crime कथा हा त्याचा पॉडकास्ट नक्की ऐकण्यासारखा आहे.
[ comfort zone, career risk, stagnation, growth, inspiration, new age media, podcasting ]
#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी
ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
Step into an infinite world of stories
English
India