वर्गात काय शिवतात ते समजतं नाही आहे? समजलं आहे पण खूप आधीच्या धड्यांचा विसर पडला आहे? परीक्षेआधी परत कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली उजळणी करायची आहे ? स्क्रीन कडे न बघता अभ्यास अभ्यास करायचा आहे ? अंध विद्यार्थ्यांना पुस्तकाचा पर्याय हवा आहे ? ह्या सगळ्याच उत्तर म्हणजे श्राव्य रूपात समजावून सांगितलेले पाठ्यपुस्तकातील धडे. हीच संकल्पना घेऊन सचिन पंडित ह्यांनी 'ऐकाकी' अँप ची सुरवात केली. ह्या अँप मुले वरील सर्व समस्यांसाठी एक उपाय मिळाला.
हि अँप सुरु करताना केलेले सर्वे, विद्यार्थी -पालक - शिक्षक ह्यांच्याशी झालेले संवाद, ह्यातून सचिनला अनेक नवीन समस्यांबद्दल माहिती मिळाली, ती माहिती आणि त्याबद्दल संभाव्य उपाय लोकांसमोर आणायला सचिनने एक पॉडकास्ट पण सुरु केला.
ऐकाकी अँप, पॉडकास्ट, विद्यार्थी -पालक - शिक्षक ह्यांच्या समस्या, त्यावर उपाय, श्राव्य रूपात शिक्षणाचे भविष्य ह्या सगळ्यावर चर्चा केली आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ५५ व्या भागात उद्योजक आणि पॉडकास्टर सचिन पंडित ह्यांच्याशी.
ऐकाकी अँप लिंक्स -
https://apps.ikakey.com/
ऐकाकी पॉडकास्टच्या लिंक्स -
https://tinyurl.com/ikakeySPOTIFY
https://tinyurl.com/ikakeyAPPLE
#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी
ऑडिओ लोगो क्रेडिट - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/
Step into an infinite world of stories
English
India