सादर आहे Selfless Parenting या माझ्या मराठी पॉडकास्ट मध्ये आजवर झालेल्या सगळ्या एपिसोड्स ची एक झलक !!! नक्की ऐका, गेल्या काही महिन्यातल्या आपल्या या प्रवासात काय काय घडलं? त्याविषयी... असं म्हणतात, when the "why" is clear, the how is easy !!! मला एखादी गोष्ट का करायची आहे? हे पक्कं माहिती असेल तर ती कशी करायची? याचे अनेक पर्याय सुचत जातात फक्त एकच गोष्ट लागते सुरुवातीला "इच्छाशक्ति " !!! ती जर असेल तर अवघड काहीच नाही . आणि याच गोष्टीची अनुभूती मी घेतली माझ्या या नवनिर्मिती मधून !!! देवाच्या कृपेने, आई बाबांच्या आशीर्वादाने, नवऱ्याच्या पाठिंब्याने, लहान असूनही 'आईचं रेकॉर्डिंग आहे,आवाज नाही करायचा' हे शहाण्यासारखं समजून वागणाऱ्या मुलींमुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या ; माझ्या प्रत्येक निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणी-आप्तेष्ट, मला साथ देणारे; माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक एपिसोड उत्तम करणारे माझे सगळे गेस्ट्स आणि सगळ्यात महत्वाचं ; मला माझ्या या निर्मितीमुळे ओळखणाऱ्या माझ्या श्रोत्यांमुळे आज हा प्रवास खूपच समृद्धपणे चालू आहे!! तुम्ही आजवर भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार !!! तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या. येणाऱ्या नवीन वर्षात पालकत्वाच्या असंख्य कंगोऱ्यांवर आधारित अनेक नवनवीन एपिसोड घेऊन येईनच तर पुन्हा भेटू याच प्रवासात लवकरच selfless parenting या मराठी पॉडकास्टवर !!! नवीन वर्षात हा प्रवास अधिक समृद्ध व्हावा हीच कामना !!! Happy Parenting & Happy New Year. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India
