श्रीगणेश पुराणानुसार गणेश जन्माची आणि त्याचं शीर हत्तीचं असल्याची कथा काहीशी अशी आहे.
देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या जया आणि विजया. दोघी अत्यंत सदाचारी आणि विवेकी होत्या., आणि देवी पार्वती त्या दोघींचा मोठा आदर करी. एक दिवस त्या दोघी पार्वतीला म्हणाल्या, “सखी! शिवजींचे इतके गण आणि तुझा एकही गण नाही. तुझा निदान एक तरी गण असायला हवा."
उमा आश्चर्याने म्हणाली,"असं का म्हणताय सख्यानो? आपल्याकडे तर कितीतरी करोड गण आहेत, जे सदैव आपल्या आज्ञा पालनास तत्पर असतात.मग कशाला बरं अजून कुठल्या गणाची आवश्यकता?
सख्या म्हणल्या,"ते सगळे गण महादेवांचे आहेत. त्यांचीच आज्ञा ते सर्वात आधी महत्वाची मानतात. नंदी, भृंगी साकाट सगळे गण तुझी आज्ञा तर मानतात पण प्रभू आशुतोषांची आज्ञाच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. जर तुम्ही काही आदेश दिला आणि शिवजींनी ती डावलली तर कुणीही गण तुमचा आदेश मानणार नाहीत. तुम्ही विचारलं तर नक्कीच ते काहीतरी बहाणा सांगतील.
देवी पार्वती ने आपल्या सख्यांचं बोलणं ऐकलं पण काही काळानंतर ती ते विसरून गेली.
एके दिवशी पार्वती स्नानासाठी चालली होती.जाताना तिने नंदिला आदेश दिला की त्याने द्वारपाल बनून कोणालाही आत जाण्यास अडवावं.
नंदी दाराशी उभा राहिला. त्याच वेळी शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. नदीश्वर त्यांना अडवत म्हणाला,"स्वामी!माता आत स्नान करते आहे,त्यामुळे कृपया तुम्ही इथेच थांबावं.
शंकराने नदीचं बोलणं ऐकलं न ऐकलंसं करत आत प्रवेश केला.
भगवंत आशुतोषाना अशा प्रकारे आत आलेलं पाहून देवी पार्वतीला आपल्या सख्यांच बोलणं आठवलं. तिच्या लक्षात आलं की सगळे गण शंकरांचे सेवक आहेत आणि त्यांचीच आज्ञा त्यांना महत्वाची वाटते. नंदीने आज माझ्या इच्छेचा उपमर्द केला आहे.जर माझा कुणी गण असता तर त्याने माझी आज्ञा प्रमाण मानली असती.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India