ज्यांना दधीची ऋषीची कथा माहीत आहे त्यांना हेही माहीत असेलच की कशाप्रकारे असुर वृत्र कोणत्याही धातूच्या बनलेल्या अस्त्रापासून अवध्य होता आणि त्याचा संहार करण्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांचा त्याग करून आपल्या अस्थी देवराज इंद्राला दान केल्या होत्या. त्याच वृत्रासुराच्या पूर्वजन्माची ही कथा.
शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक राजा होता. ज्याने पूर्ण पृथ्वीवर विजय प्राप्त केला. राजाची शक्ती इतकी होती की त्याच्या राज्यात राहणार्या सर्वांसाठीच्या खाण्याच्या वस्तू आपोआप उत्पन्न होत असत. राज्यात सुख-समृद्धी अशी होती, की प्रजा राजाला दूसरा ईश्वर मान त असे. धन-दौलत, ऐश्वर्य, चित्रकेतूला कशाचीही कमी नव्हती. आपल्या पराक्रम आणि शौर्याने त्याने अनेक सुंदर स्त्रियांचं हृदयही जिंकलं होतं. चित्रकेतूच्या एक कोटी राण्या होत्या. परंतू एवढं ऐश्वर्य असूनही तो निःसंतान होत. त्यामुळेच तो नेहमी चिंतेत असे.
एक दिवस तिन्ही लोकी भ्रमण करण्यासाठी निघलेल्या प्रजापती अंगिरा ऋषीनी चित्रकेतूच्या महाली त्याचं आतिथ्य स्वीकारलं. राजकडे सर्वकाही असूनही त्याचा उदास चेहरा पाहून ब्रह्मर्षीनी याचं कारण विचारलं, चित्रकेतू म्हणाला, "हे भगवान, समग्र सृष्टीतील सगळी सुगंधित फुलं मिळूनही एखाद्या भुकेलेल्या माणसाची भूक शमवू शकत नाहीत, त्याच प्रकारे हे सारं ऐश्वर्य मिळून एका निपुत्रिक पित्याचे दुःख दूर करू शकत नाही. भुकेलेल्याला जशी अन्नाची आवश्यकता असते त्याच प्रकारे, हे भगवान मला एक पुत्र प्रदान करून माझी ही पीडा दूर करा."
त्रिकालदर्शी अंगिरा ऋषींना हे चांगलंच ठाऊक होतं की चित्रकेतूच्या भाग्यात संतान सुख नाहीए. पण त्याच्या हट्टापुढे ब्रह्मर्षीही हतबल झाले. म्हणून एका यज्ञाचं आयोजन करून त्यातून उत्पन्न झालेलं चरू त्यांनी राजाची पट्टराणी कृतद्युतीला दिलं. यथावकाश कृतद्युतीने एका अत्यंत सुंदर पुत्राला जन्म दिला. एक करोड राण्या असूनही निःसंतान असलेल्या चित्रकेतूसाठी पहिल्या मुलाचं सुख स्वर्गावर विजय मिळवण्याच्या आनंदापेक्षाही अधिक आनंददायी होतं. राजकुमाराच्या येण्याने संपूर्ण राज्यात जणू उत्सवाचा माहोल बनला होता.
परंतू हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. राणी कृतद्युतीने राजकुमाराला जन्म दिला होता, त्यामुळे राजाचं सारं लक्ष आपल्या पट्टराणीतच गुंतून राहू लागलं. ते पाहून इतर राण्यांच्या मनात इर्षेची भावना निर्माण झाली. त्यांचा द्वेष इतका वाढला की राजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा दोष नवजात बालकाला त्या देऊ लागल्या. त्याच्या मनातील घृणा इतकी वाढली की एके दिवशी रागाच्या भरात त्यांनी छोट्या राजकुमाराला विष दिलं. कृतद्युतीला ही गोष्ट कळेपर्यंत फार उशीर झाला होता. राजकुमारच्या प्राणांनी त्याच्या नश्वर शरीराचा त्याग केला होता.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India