Step into an infinite world of stories
डॉक्टर छाया महाजन हे नाव मराठी साहित्य विश्वात सर्व परिचितच आहे. इंग्रजीच्या प्राध्यापिका आणि एका नामवंत कॉलेजच्या प्राचार्य असलेल्या डॉक्टर छाया महाजन यांचे अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि ललित लेखक संग्रह आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. त्यांची मानसी ही कादंबरी बरीच गाजली. ही कादंबरी प्रकाशित झाली त्याला 17 वर्षे होऊन गेली पण जो विषय लेखिकेने या कादंबरीत मांडला आहे तो आजच्या परिस्थितीला अत्यंत समर्पक असाच आहे. जग अजून आधुनिक झालाय, पुढारलेला आहे पण तरीसुद्धा या जगामध्ये मुलींना मोकळीत देताना, तू स्वातंत्र्य गमवू नकोस, मुक्त रहा, तुझ्या मर्जी ना जग, असा सल्ला सहज दिला जातो पण खरोखरच स्त्री इतकं मुक्त जगू शकते का किंवा तिने जगाव का!?कारण स्वच्छंदी जगताना जर तिचा तोल सुटला, ती वाहवत गेली तर तिच्या आयुष्याची वाताहतच होते. आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही परिस्थितीला कारणीभूत स्त्रीलाच मानलं जातं पुरुष सगळं करून नामानिराळा राहतो. पुरुषप्रधान संस्कृतीचं हे द्योतक आहे. विधिवत नात्यांचा, संस्कारांचा, रूढी परंपरांचा शिक्का एवढा खोलवर समाजात, जनमानसात एखाद्या गुणसुत्राप्रमाणे रुजलेला आहे जो आपण नाकारूच शकत नाही, टाळू शकत नाही. स्त्री कितीही शिकली पुढारलेली झाली तिने अवकाशालाही गवसणी घातली तरी सुद्धा तिने आपलं स्त्रीत्व जपावं की स्वतःला स्वैर सोडून द्यावं? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मानसी कादंबरीत मिळतं.
समाजाला एक दिशा देणारी ही कादंबरी आहे. याआधी डॉक्टर छाया महाजन यांची तन-अंधारे ही कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात स्टोरी टेल ॲप वर प्रकाशित झाली आणि तिला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. चार महिने ती स्टोरी टेल वर प्रथम क्रमांकावर होती.
आता मानसी ही कादंबरी आम्ही ऑडिओ बुक स्वरूपात स्टोरीटेल ॲप वर लवकरच तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोयं... ह्याला ही रसिक श्रोत्यांना उदंड प्रतिसाद मिळाला ही अपेक्षा आणि विनंती..
© 2025 Zankar (Audiobook): 9789364380751
Release date
Audiobook: July 6, 2025
Tags
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International