Step into an infinite world of stories
5
Biographies
आपल्या अवघ्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात प्रचंड बुद्धिसामर्थ्याने तत्कालिन संपूर्ण पंजाब प्रांतावर छाप पाडून आपल्या विद्वत्तेच्या चुणुकेने मॉनियर विल्यम, पिनकॉट इत्यादि प्राच्यभाषाकोविदांना ज्याने चकित करून निरुत्तर केले, मॅक्समुल्लरसारख्या युरोपियन विद्वानांना त्यांच्या वेदोपनिषदांच्या भाष्यांत चुका झाल्या असल्याचे ज्याने मान्य करावयास लावले, आपल्या अल्प आयुष्यात ज्याने अरबी, फारसी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषा करतलमलवत् करून सोडल्या, आर्यसमाजांत ज्याने महर्षि दयानंद सरस्वती यांच्या खालोखालचा दर्जा या अल्पकालांत प्राप्त करून घेतला, विद्वत्तेप्रमाणेच वक्तृत्व कला ज्यांच्यावर पूर्णपणे प्रसन्न होती आणि तिच्या जोरावर ज्याने लाहोरच्या ऐतिहासिक डी. ए. व्ही. ( दयानंद ॲंग्लो वैदिक ) कॉलेजच्या स्थापनेसाठी एकेका व्याख्यानांत शेकडो रुपये आर्थिक सहाय्य मिळवून दिले, संपत्ती किंवा सत्ता यांची यत्किंचितहि हाव न धरता ज्याने आपले छोटेसे जीवन केवळ आर्यसमाजाच्या कार्यासाठीच समर्पित केले आणि ते कार्य करीत असतानाच ज्याने या इहलोकाचा निरोप घेतला, नव्हे त्या कार्यभारामुळेच ज्याचे इहलोकीचे जीवन इतक्या अल्पकालात विराम पावले, त्या विस्मृतीत गेलेल्या पंडित गुरुदत्त विद्यार्थी यांचे हे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायी असे आहे.
कठोर नास्तिक ते तर्कसंगत आणि बुद्धिप्रामाण्यवादी आस्तिक असा त्यांचा विस्मयचकित करणारा जीवन प्रवास होता.
डिएव्ही ( दयानंद ॲंग्लो वैदिक) कॅालेज आणि शिक्षण संस्था स्थापन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात डिएव्ही संस्थेची शाळा/कॅालेजेस् म्हणजे समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी निर्माण करणारे जणू कारखानेच होते एवढे अवाढव्य कार्य या संस्थेचे होते. महान क्रांतिकारी शहीद ए आजम सरदार भगतसिंह हेही डिएव्हीचेच माजी विद्यार्थी होते.
पंडित गुरूदत्त विद्यार्थी यांचा जन्म २६ एप्रिल १८६४ रोजी मुलतान शहरी एका पिढीजात सरदार कुळात झाला. त्यांच्या पूर्वजांनी युद्धक्षेत्रावर आपले रणकौशल्य दाखविले होते आणि एक वेळ बऱ्याच मोठ्या भागावर त्यांचे राज्यही चालू होते. युवा मनीषी पंडित गुरूदत्त यांचे हे जीवनचरित्र आपण सर्वांनी ऐकावे आणि त्याबाबत आपल्या परिचितांनाही सांगावे ही नम्र विनंती.
जयहिंद 🇮🇳 ॥ आजादी का अमृत महोत्सव ॥
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399937
Release date
Audiobook: June 19, 2023
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International