Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन season ची सुरुवात एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाने करतीये जो आपल्याकडे कधीच बोलला आणि हाताळला जात नाही ... आणि केवळ त्या विषयी असणाऱ्या गैरसमज , आकस आणि नकारात्मकता यामुळे आजवर अनेक मुलंमुली भरडली गेली आहेत ; जात आहेत. आपलं मूल वयात येणार हे प्रत्येकच पालकाला माहिती असतं पण त्याचं "sexual orientation" काय असणारे? हे आपण ठरवू शकत नाही; ते निसर्गाने च ठरवलेलं असतं आणि ते जसं असेल त्या प्रमाणे त्याला किंवा तिला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे या गोष्टीचा acceptance प्रत्येकाला असणं गरजेचं आहे.. जो दुर्दैवाने आपल्या समाजातल्या काही घटकांच्या बाबतीत अजिबात नाहीये! हो,"समलैंगिकता " !!! जी खरं तर अतिशय "normal " आहे. ह्या विषयी कमालीची उदासीनता आणि तिरस्कार आहे आपल्याकडे . असं मूल अगदी कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकतं; म्हणूनच त्याविषयी मुला- पालकांना योग्य अशी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने मी घेऊन येतेय एका खूप humble आणि sensible "gay couple " ला ज्यांच्या अनुभवांचे बोल आपल्या सगळ्यांसाठी real eye opener ठरतील !!! समीर समुद्र आणि अमित गोखले !!! LGBTQ community साठी activists म्हणून काम करणाऱ्या , अशा मुला- पालकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या, एक माणूस म्हणूनही ज्यांचा खरोखरी अभिमान वाटवा अशा या २ व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. एक सजग पालक होण्याच्या दृष्टीने या बाबत जाणून घेणं, तो awareness असणं आणि त्याविषयी खरी माहिती बाळगणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. नक्की ऐकाल , समजून घ्याल आणि जास्तीतजास्त share कराल हा आपला एपिसोड अशी आशा आहे !!! "स्विकारुया समलैंगिकतेला" Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India