नमस्कार, ४ मे २०२० ह्या दिवशी इन्स्पिरेशन कट्टा चा पहिला एपिसोड आला होता. गेल्या ४ वर्षात माझ्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडले, आणि ह्याला निश्चित कारण म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा.
ह्या पॉडकास्ट मधून मला स्वतःला इतकं शिकायला मिळलं की ' जो जे वांछील' हे पुस्तक त्यातून मी लिहू शकलो.
४ मे २०२० ह्या दिवशी माझे हात थरथरत होते, खूप भीती वाटत होती, त्या सिटूएशन पासून, अँपल पॉडकास्ट च्या चार्ट वर १ नंबर वर येणे, नेक्स्ट बिग क्रिएटर अवॉर्ड मिळणे, दोन पुस्तक प्रकाशित होणे हा सगळा प्रवास भन्नाट होता.
इन्स्पिरेशन कट्टा वर परत एकदा आपण नवीन पाहुण्यांसोबत गप्पा करायला लवकर भेटणार आहोत, पण त्या आधी आपल्या जुन्या एपिसोडचा रिकॅप बघुयात, म्हणजे तुम्ही एखादा एपिसोड ऐकला नसेल तर त्यातला सार इथे मिळेल.
ह्या सिरीयस चा हा पहिला एपिसोड.
Step into an infinite world of stories
English
India