गौतम नारि श्राप बस उपल देह धरि धीर।
चरन कमल रज चाहति कृपा करहु रघुबीर।।
वैदिक भारतातील काही सुंदर स्त्रीयांमध्ये अहिल्या देवीचे नाव घेतले जाते. अहिल्या ही सृष्टिचे निर्माता ब्रम्हदेवांची मानस कन्या. तिचे पती गौतम ऋषि यांनी तिला, ती दगड होईल असा शाप दिला. पतीने दिलेल्या या शापामुळे अनेक वर्ष अहिल्या दगडाची एक मूर्ती बनून राहिली. शेवटी त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी आपल्या स्पर्शानं तिचा उध्दार केला. गौतम ऋषिंनी अहिलेल्या का दिला असेल दगड होण्याचा शाप?
ऐकूया रामायणातील देवी अहिल्येची कथा. रामायणामध्ये ही कथा ब्रह्मर्षि विश्वामित्र यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना सांगितली होती.
ब्रम्हदेवांची मानस कन्या अहिल्येचं सौंदर्य अपरिमित होते. रूपानं आणि गुणानं कोणत्याही स्त्रीसोबत तिची तुलना होऊ शकत नव्हती. ब्रम्हदेवांच्या आशिर्वादानं अहिल्या देवीचा विवाह महर्षि गौतमांसोबत झाला. ते दोघेजण मिथिला नगरीजवळ एका आश्रमात राहू लागले.
एके दिवशी देवराज इंद्र, गौतम ऋषिंच्या आश्रमाजवळून जात होता. त्यावेळी त्यांची दृष्टी अत्यंत सुंदर अश्या अहिल्येवर पडली. देवी अहिल्येला पाहून इंद्राची वासनाचाळवली. तो स्वतःला आवरू शकला नाही. त्यांनं कोणत्याही परिस्थितीत अहिलेल्या मिळवायचंच असा निर्धार केला. त्यानंतर एके दिवशी ब्राह्ममुहूर्ताच्या आधी प्रातःकाली कोंबड्याचा आवाज काढून त्यानं गौतम ऋषिंना चकवलं. गौतम ऋषिंना वाटलं की ब्रह्ममुहूर्त झाला आणि म्हणून ते नदीवर स्नानासाठी निघून गेले
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India