वैवस्वत मनूची पहिली मुलगी इला आणि चंद्रपुत्र बुध या दोघांचा पुत्र पुरूरवाने चंद्रवंशाची स्थापना केली आणि अनेक वर्ष धर्माने प्रजापालन केले. महाराज पुरुरवा आणि अप्सरा उर्वशीचा पुत्र आयूने त्यांच्या पश्चात चंद्रवंशाची धुरा सांभाळली आयू आपल्या पित्याप्रमाणेच राजधर्माचे पालन करणारा प्रतापी आणि प्रजावत्सल राजा होता. एवढं ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त करूनही आयूचं मन मात्र नेहमीच नि:संतान असल्याच्या दुःखात बुडून गेलेलं असे. त्यांच्या पश्चात चंद्रवंशाच्या अस्तित्वाचं काय होईल या चिंतेत तो सदैव गुरफटून गेलेला असे.
मनात एका उत्तराधिकार्याची कामना घेऊन राजा आयूने महाराणी प्रभा यांच्यासह भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी शंभर वर्ष भगवान दत्तात्र्येयांच्या आश्रमात राहून त्यांची सेवा केली. त्यांच्या सेवा आणि भक्तीने संतुष्ट होऊन त्रीदेवांचे अवतार भगवान दत्तात्रेयांनी त्यांना एका चक्रवर्ती पुत्राचं वरदान दिलं. अशा प्रकारे पुत्र प्राप्तीचे वरदान प्राप्त करून महाराज आयू आणि महाराणी प्रभा राजमहालात परतली आणि पुत्रजन्माची प्रतीक्षा करू लागली.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India