خطوة إلى عالم لا حدود له من القصص
4.6
تطوير الذات
राजे - यशाची वाटचाल रोजच्या लाईफ मध्ये संकंटं येत असतात. अनेक समस्या उद्भवत असतात. बऱ्याच वेळा आपण उत्तरं शोधत सेल्फ - हेल्फ साठी अनेक पुस्तकं वाचत असतो, हल्ली च्या भाषेत बोलायचं तर , स्टोरीटेल वर ऐकत असतो. उदा. निर्णय कसे घ्यावेत .. हे अरुणाताईं यांचे पुस्तक, त्यांची इतरही पुस्तके जसे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ... माझ्या कॉलेज जीवनात यू कॅन विन या पुस्तकाने धुमाकूळ घातला होता. हि सर्व पुस्तकं तुमच्या अल्गोरिदम वर नक्कीच परिणाम करतात आणि काही काळासाठी का होईना तुमचे कॉन्फिगरेशन बदलून तुमचा गुंता, प्रश्न सोडवतात. राजे - यशाची वाटचाल हे नीता सराफ यांचं , छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील मास्टर माईंड हा पैलू घेऊन लिहिलेलं पुस्तक, वरील सर्व पुस्तकापेक्षा एका वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतं . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या लाईफ चा अविभाज्य घटक आहे. अस्मिता आहे , अभिमान आहे, इन्स्पिरेशन आहे , मोटिव्हेशन आहे , स्टोरी आहे ... आणि बरंच ... प्रश्न असा आहे कि मग मी त्यातून काही घेऊन अप्लाय करू शकतो का आणि रिझल्ट मिळतो का ?हाच प्रश्न नेमका सोडवलाय नीता सराफ यांनी, राजे - यशाची वाटचाल या पुस्तकातून ... इतिहासाची एक ब्रँच म्हणजे अँप्लाईड हिस्ट्री, इतिहासाचा अभ्यास करून आपण काही शिकून अप्लाय करू शकतो का ? तर नक्कीच ... आपण एक पाऊल पुढं जावून आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, नोकरी , व्यवसाय , शिक्षण , खेळ , करिअर ... यात काही अप्लाय करू शकतो का ? हा प्रश्न महत्वाचा आहे . राजे - यशाची वाटचाल हे पुस्तक केवळ इतिहास आणि इतिहासाचे अँप्लिकेशन नसून हे पुस्तक प्रत्येकाला सेल्फ -हेल्फ द्वारे मदत करणारे पुस्तक आहे. मग तुम्ही म्हणाल कि , इतर वारेमाप पुस्तकं आहेत, हेच का ? तर याचं उत्तर सोपं आहे , कारण यात आपल्या आराध्य दैवताच्या चरित्रातील घटनाच आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला , आपले प्रश्न, गुंते, समस्या चुटकी सरशी सोडवता येणार आहेत. हे पुस्तक ऐकल्यावर , तुमच्या मनातूनच, तुमच्या मेंदू द्वारे , तुमची स्वतः ची महाराजांची प्रतिमा तुमच्या प्रतिभेशी डायरेक्ट संवाद साधून तुम्हाला मार्गदर्शन करती होणार आहे. उदा. या पुस्तकातली आठवे प्रकरण की ज्यात पन्हाळगड वेढा आणि पुढील सर्व प्रसंग आला आहे जो सध्या गाजत असलेल्या पावनखिंड चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकला आहे. लेखिकेने या सर्व प्रसांगाचे वर्णन तर अंगावर काटा येईल असेच केले आहे आणि वंदना यांनी ते त्यांच्याआवजात प्रभावी रित्या मांडले आहे, पण जेव्हा तुम्ही ग्रोथ माईंडसेट ठेवून पुढे जात असतां तेव्हा संकट आल्यावर किंवा तुम्ही एखाद्या विचित्र गुंत्यात अडकले असाल( वेढा ) तर शॉर्टटर्म ध्येय निश्चित करून त्यावर मास्टर माईंड अप्लाय केले तर त्यातुन अपल्याला नक्कीच सुटका करता येते हा विचार मुद्देसूद मांडला आहे. मी स्वतः याचा अप्लाय करून अनुभव घेतला आहे आणि माझ्या मनातील गुंता सोडवून पुढे वाटचाल करीत आहे. हे पुस्तक २१ मार्च पासून स्टोरीटेल वर उपलब्ध होत आहे जरूर या पुस्तकाचे श्रवण करून लाभ करून घ्यावा ... हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना ! ऑल दि बेस्ट --- Satyajeet from Zankar Studio
© 2022 Zankar (دفتر الصوت ): 9789393051677
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 21 مارس 2022
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة