Step into an infinite world of stories
Non-Fiction
"हॉप ऑन हॉप ऑफ" अरुण (भाऊसाहेब) कुदळे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांचे हे प्रवासवर्णन म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेल्या प्रवासातील अनुभव, दृश्य, भावना आणि घटनांचे लेखन. हे केवळ ठिकाणांचे वर्णन नसून, त्या प्रवासात घडलेल्या गोष्टी, भेटलेली माणसं, स्थानिक संस्कृती, अन्न, भाषा, आणि त्या प्रवासाने दिलेला आत्मिक अनुभव यांचे चित्रण आहे.
• वास्तव आणि कल्पनाशक्ती यांचा समतोल • स्थानिक जीवनशैलीचे चित्रण • प्रवासातील अडचणी, आनंद, आणि शिकवण • वाचकाला त्या ठिकाणी नेण्याची ताकद ह्या सर्व निकषांवर भाऊसाहेबांचे प्रवासवर्णन उत्कृष्ट ठरते . असे वाटत नाही की हे एका नवख्या लेखकाने लिहिले आहे . हे पुस्तक फक्त प्रवासाचे अनुभव सांगत नाही तर अनेक जीवन अनुभव सादर करते त्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रेरक धडे पण मिळतील . हे पुस्तक युवा पिढीपर्यंत पोचले पाहिजे . अनेक अनुभव बोलके व भावनाप्रधान आहेत . परदेशी शिक्षण न घेता उद्योजक होणे , स्वदेशी दर्जा साठी ग्राहकाला विश्वास देणे , रोटरीच्या प्रशिक्षण वर्गात अमेरिकेत असताना झालेले वडिलांचे हृदयदारक निधन . किती लिहू. "काय त्या अमेरिकेला सोनं लागलाय" हा लेख सद्यस्थितीत अजून भावतो. सर्वानी नक्की ऐकावे असे पुस्तक . सोबतीला संजय डोळे आणि प्रियांका गोगटे यांचे सुश्राव्य अभिवाचन ...
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364384858
Release date
Audiobook: 15 August 2025
English
India