Madhura
4 Oct 2022
आज दसरा....त्यामुळं "रावण " नावाची आठवण येणं साहजिक आहे. पण रावण चांगला की वाईट या वादात न फसता मागच्या आठवड्यात वाचून संपवलेलं ✍🏻शरद तांदळे लिखित रावण पुस्तक कस वाटलं हे सांगते आजच्या मुहूर्तावर. हजारो वर्षांपासून आपला समाज रावणाला जाळत आला आहे, तरी तो संपलाय कुठे?प्रत्येक वेळी आपण एकच लॉजिक सांगून जसं अधर्मावर धर्माचा विजय , किंवा पापावर पुण्याचा विजय, किंवा असुरांवर देवांचा विजय असच लॉजिक लावत आलोय. पण लेखकाच्या लेखणीने रावण एक सामान्य व्यक्ती ते राक्षसांचा राजा पर्यंतचा प्रवास खोल रित्या मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.खरचं रावण म्हंटल की पहिला डोळ्यासमोर येतो तो दहा तोंडाचा , क्रूर, अधर्मी, सितेच अपहरण करणारा, वाईट असा तो .कारण हेच तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवल गेलं आहे. पण खरचं रावण तेवढा क्रूर होता का ? त्याला खरचं दहा तोंड होती का ? त्याचे आईवडील कोण? तो असूर होता की ब्राम्हण? त्याची पूर्ण वंशावळ ? लंका सोन्याची बनवायची idea कुणाची ? बनवली कुणी ? पुष्पक विमान कुणाचं ?रावणान सीतेला पळवून नेण्याचं खर कारण काय ? रावण हे नाव कुणी दिलं? अशा अनेक प्रश्नांची उत्तर मिळालं.