Step into an infinite world of stories
Biographies
हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला. सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली. अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूॅँह पेâरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…! अश्या ह्या महान गीतकाराचा हा जीवनप्रवास हे ऑडिओबुक सांगतं .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789369319770
Release date
Audiobook: 22 April 2021
English
India