Step into an infinite world of stories
4.5
Biographies
चंद्रशेखर वेंकटरामन (जन्म : ७ नोव्हेंबर १८८८; मृत्यू : २१ नोव्हेंबर १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. सी.व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.सी.व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला आणि य्या खनिजांच्या प्रकाश-विकिरणाच्या गुणधर्मांंचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्या देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी.व्ही रामन तो अनेकदा लहान हाताळण्याएवढा स्पेक्ट्रोस्कोप घेऊन जात असत. त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते.चंद्रशेखर वेंकटरामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. त्यांचे जीवनचरित्र ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल.
Release date
Audiobook: 11 October 2020
English
India