Step into an infinite world of stories
एक होती माया ताडोबाच्या राणीची नाट्यमय जीवनकहाणी! ताडोबाच्या निसर्गरम्य अरण्यात, एक वाघीण जन्माला आली- माया! लहानपणीच्या तिच्या खेळकर दिवसांपासून ते जंगलाची अनिभिषिक्त राणी होईपर्यंत, मायाचं आयुष्य हे यशापयश, संघर्ष आणि जीवाच्या आकांताने भरलेल्या लढायांचं होतं. तिनं आपल्या अधिवासावर अत्यंत आक्रमकपणे आणि ताकदीने राज्य केलं. आपल्या बछड्यांना वाढवताना तिनं अनेक संकटांना सामोरं जात, जबरदस्त संघर्ष केला. जो कोणी मायाला पाहू शकला, त्याच्या मनावर तिची मोहिनी कायम राहिली. आणि मग, एक दिवस, माया अचानक गायब झाली- कुठलाही ठसा न ठेवता. तिचं गायब होणं आजही एक गूढच आहे. 'एक होती माया'ची पहिली आवृत्ती ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रकाशित झाली. या पुस्तकाला लोकमत साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या एखाद्या वाघिणीच्या आयुष्यावर लिहिलं गेलेलं भारतातलं बहुदा हे पहिलंच पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे एका अफाट लोकप्रिय, धैर्यवान आणि जिद्दी वाघिणीला वाहिलेली उत्कट प्रेमांजली आहे. लेखक, प्रकाशक, वाचन: अनंत सोनवणे या पुस्तकाच्या उत्पन्नातील काही भाग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या व्याघ्र संवर्धन कार्यासाठी दिला जाणार आहे.
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789334290851
Release date
Audiobook: 29 July 2025
Tags
English
India