Step into an infinite world of stories
Fantasy & SciFi
महामाया निळावंती एक सर्वोत्कृष्ठ कादंबरी ! निसर्गाच्या जवळ जाणारी, निसर्गाच्या ठायी असलेल्या अप्राप्य ताकदीचा आणि त्यातल्या आस्तिकतेचा शोध घेणारी ही कथा......... ४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. पाहिलं तर निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. असं म्हणतात कि जो हि पोथी ऐकतो किंवा वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अशीच एक कथा आहे विक्रमची...... एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो.आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. पण बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंती चा खून केला नव्हता का? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? 'महामाया निळावंती'.लेखक सुमेध ह्यांची जादुई, थरारक व मेंदू सोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.....विनम्र भाबल यांच्या आवाजात
© 2025 Storyside IN (Audiobook): 9789353989996
Release date
Audiobook: 23 June 2025
Tags
English
India