Step into an infinite world of stories
कॅंडल लाईट डिनर मस्त होतं. पण नवीन नवीन प्रेमात पडल्याचं अवघडलेपण दोघांना जाणवतंय. रविवारचा दिवस दोघे आळसाने मिठीत पडून राहण्यात, जेवण बनवण्यात आणि एकमेकांची मस्करी करण्यात घालवतात. पण अक्षय काही बोलतो आणि रविवारचा छान दिवस भांडणाने संपतो. मंजिरीचा राग घालवायला म्हणून अक्षय काही फिल्मीपणा करायला जातो. मंजिरी आणखी चिडते. माधुरी त्यांना एक आयडिया देते. लिव्ह इनसाठी फ्लॅट बघायला जाताना फ्लॅट बघण्याआधीच मंजिरी ब्रोकरला पैसे देऊन ठेवते. त्यातून वेगळे घोळ होतात. ते निस्तरता निस्तरता अक्षयच्या नाकी नऊ येतात. पण या सगळ्यात आपला वाढदिवस मंजिरीच्या लक्षात नाही याचं अक्षयला वाईट वाटतंय. मंजिरी आणि अक्षय एकत्र राहत आहेत. मंजिरी आपल्या वाढदिवसाबद्दल काहीच बोलत नाही याबद्दल अक्षयची चिडचिड होत आहे.
Release date
Audiobook: 10 March 2023
English
India