pratibha
13 Oct 2020
काल नितीन थोरात सरांची सोंग कादंबरी ऐकलीअंगावर काटा उभा राहिला ऐकायला सुरुवात केली तर पूर्ण भान हरपून ऐकत होते पुढे काय झालं असेल ही गोष्ट खिळवून ठेवते शेवटपर्यत आणि शेवटी इतका अकल्पित??? अस का हा प्रश्न डोक्यात थैमान घालतो?? नितीन सर नुसत काळजाला हातच घालत नाही तर काळीज काढून हातात देतात सुन्न..... भान हरपतपरत पुढच्या भागाची ओढ नितीन सरांच लेखन त्याचा अवाका कल्पनेच्या पलीकडं आहे एक क्षण असं वाटून जात अरे फेसबुक वर लिहतो तो माणूस हाच आहे का ?का हाच माणूस फेसबुक वर लिहतो???आणि या सगळ्याला चारचाँद लावलेत Milind Shinde सरांच्या आवाजाने आवाजाचा बादशाह प्रत्येक आवाज वेगळा, लकब वेगळी,आख्य चित्रं जसंच्या तस समोर उभा राहतं त्याच्या आवाजाने नितीन सरांच लिखाण आणि मिलिंद सरांचा आवाज अफलातून भट्टी जमलीये Thanku Storytel माझ्या सारख्या पुस्तक घेऊन वाचायचा कंटाळा येनाऱ्या लोकांसाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून दिलात😊