Step into an infinite world of stories
वळचणीचे पक्षी कथेचं हे शीर्षकच सूचक आणि कथेचं थोडक्यात वर्णन करणारं आहे! साधारणपणे तीन पिढ्यांची ही नव्या युगातील कथा. श्रुती नावाच्या तरुणीचं लहान वयातलं फसलेलं प्रेम, पुढे घरच्यांनीच ठरवलेल्या लग्नानंतर श्रुति आणि राहूल अमेरिकेत राहू लागतात, वर्षभरातच संसारवेलीवर अर्णव नावाचं फूलही फुलतं, पण तरीही या जोडप्यामधे हळू हळू टोकाचा दुरावा येतो आणि श्रुतीला तिसर्याच एका माणसाचा आधार घ्यायला लागतो. आणि अर्णवबाबत एक कठीण आणि फार प्रॅक्टिकल असा निर्णय श्रुती घेते. पण म्हणून श्रुति या कथेची सर्वार्थाने नायिका आहे असं म्हणता येणार नाही, इतकं सुनंदाचं म्हणजेच श्रुतीच्या आईचं पात्र संपूर्ण कथेला व्यापून उरलेलं आपल्याला जाणवतं. आता इतक्या मोठ्या कालखंडाला व्यापलेली कथा म्हटल्यावर पात्रही काही अगदीच कमी नाहीयेत . अगदी सुनंदा, सुनंदाचा पति प्रकाश, त्यांचे व्याही, श्रुतीचा धाकटा भाऊ कॉलेजकुमार चिन्मय, त्याची मैत्रिण शिल्पा आणि राहूल श्रुतीचा गोंडस लेक अर्णव ही पात्रं जितकी महत्वाची आहेत, तितकंच महत्वाचं एक पात्र, (जे कथेत अगदी काही सेकंद येऊन जातं, )......ते म्हणजे शांताबाई कामवाली. अशी ही काहीशी संथ गतीने पुढे सरकणारी जुन्या आणि नव्या पिढीतल्या विचारसरणीतले फरक अधोरेखित करणारी नव्या युगाची कथा..
© 2025 Zankar (Audiobook): 9789364387880
Release date
Audiobook: 8 August 2025
Tags
English
India