Step into an infinite world of stories
5
17 of 18
Religion & Spirituality
अजय अतुल – नाटक, मालिका, चित्रपट, संगीत अल्बम्स अशा क्षेत्रात सहज मुशाफिरी करणारी अजय अतुल ही द्वयी. पुण्याच्या अजय गोगावले आणि अतुल गोगावले या भावंडांची समान आवड म्हणजे संगीत. तसं पाहील तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही परंतु त्यासाठी पूरक वातावरण नक्की होतं. संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेण आर्थिक दृष्टीने शक्य नव्हतं पण संधी मिळेल तिथे, अगदी मंदिरात, शाळेत व बॅंड पथकांसोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली. २००३ साली त्यांना सही रे सही या नाटकासाठी पहिला पुरस्कार मिळाला. याचबरोबर मालिका आणि चित्रपट क्षेत्रात देखील त्यांनी आपले नाव अधोरेखित केलं. मराठी तसेच हिंदी, तेलगू, संस्कृत भाषेतील गाण्यांचेही संगीत दिग्दर्शन केलं. आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या या कारकिर्दीला गौरवण्यात आले आहे. सूर आणि तालाच्या साथीने सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला ऐकुया वेधच्या या सत्रात
Release date
Audiobook: 23 February 2023
English
India