Step into an infinite world of stories
4
18 of 18
Non-Fiction
कार्तिकेयन गणेशन - भारतातील पाँडिचेरी येथे जन्मलेल्या कार्थिकेयनने मद्रास विद्यापीठातून एम. एस. सी. केल आहे. याचबरोबर मानसशास्त्रात मास्टर्स आणि विशेष मुलांसाठीच्या शिक्षणात बी. एड. केल आहे. कार्थिकेयन जवळजवळ १५ वर्षे एका सर्वसमावेशक अनाथाश्रमात वाढला. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अपंग आणि सर्वसाधारण मुले या अनाथाश्रमात एकत्र राहत होती. दिव्यांगांना समाजात मिळणारी वेगळी वागणूक जाणवून देणारी एक घटना कार्तिक सोबत घडली. या घटनेने कार्थिकेयनच्या मनात घर केले. बौद्धिक आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या या मुलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिल्यास त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी मदत करता येईल याची जाणीव त्याला झाली. २०१३ साली कार्तिकने देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेतून, कोनमंगलम गावात, कोरडवाहू आणि नापीक असलेली ८ एकर जागा घेतली. तिथे आपल्या स्वप्नातील विशेष मुलांच गाव बसवण्याचे ठरवले, आणि स्थापना झाली 'सृष्टी फाउंडेशनची'.
Release date
Audiobook: 24 February 2023
Tags
English
India