734 Ratings
4.24
Language
Marathi
Category
Personal Development
Length
5T 46min

The Alchemist

Author: Paulo Coelho Narrator: Sandeep Karnik Audiobook

अलकेमिस्ट (पोर्तुगीज: O Alquimista) ही ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या, ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुवादित बेस्टसेलर बनली.

'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी. स्वप्नं साकार करणारी जादूभरी कथा पाउलो कोएलो यांच्या लेखणीतून उतरली आहे. आपल्या आंतरिक आवाजाची जाणीव करून देणारी ही कथा आहे.

'कोणत्याही खजिन्याचा शोध बाहेर कशाला घ्यायचा, तो आपल्याशीच तर असतो,' असा संदेश देणारे हे कथानक आहे. प्रतीकं आणि शकुनांचं भान ठेवून स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील कसं राहावं, याचं मार्गदर्शन ही कादंबरी करते. वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी ही अद्भूत आणि रंजक कादंबरी. संदीप कर्णिक यांच्या आवाजात.

© 2021 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353816629 Original title: द अल्केमिस्ट Translator: Dr.Shuchita Nandapurkar-Phadake

Explore more of