Step into an infinite world of stories
4
Biographies
भारतात जे अनेक चांगले क्रिकेटपटू तयार झाले त्यातला सुनील गावसकर हा एक श्रेष्ठ. 'सनी डेज्' हे त्याचं क्रिकेटवर लिहिलेलं अतिशय सुंदर व वाचनीय पुस्तक. त्या पुस्तकाचा खप फार प्रचंड झाला. फारच थोडे खेळाडू असे आहेत की, जे लिहू शकतात. गावसकर हा त्यापैकीच एक. तो स्वतः लिहितो आणि त्याचं लिखाण मोठं बहारदार असतं. 'आयडॉल्स' या पुस्तकात सुनील गावसकरनं क्रिकेट विश्वातल्या एकतीस उत्कृष्ट समकालीन खेळाडूंचं आपल्या चित्रमयी भाषेत शब्दचित्र रेखाटलंय. त्यांच्या कलेचं कौतुक केलंय. हे सगळे एकतीस खेळाडू तुमचे आमचे, सर्वांचे आवडते 'हिरोज्' आहेत. गावसकरही त्यांना मानतो. त्यांचं तंत्र, शैली आणि पद्धत गावसकरच्या मनात भरली आहे. त्यांच्या खेळातली कलाही गावसकरला भुरळ पाडते. तिलाच त्यानं इथं शब्दरूप दिलंय. गावसकरने आपल्या पुस्तकात 'क्रिकेट दैवतांची' जी पलटण उभी केली आहे त्यात गॅरी सोबर्स, रोहन कन्हाई, इम्रानखान, झहीर अब्बास, ग्लेन टर्नर, ग्रेग चॅपेल, ईअन चॅपेल, जेफ थॉमसन, बिशनसिंग बेदी, गुंडाप्पा विश्वनाथ, डेरेक अंडरवूड व अॅलन नॉट इत्यादी थोर थोर खेळाडूंचा समावेश आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9788193726365
Release date
Ebook: 6 May 2021
English
India