Step into an infinite world of stories
हृदयाच्या गोष्टी या जिवाभावाच्या. हृदय म्हटलं की प्रत्येकाचे कान टवकारलेच म्हणून समजा . हे कव्हर बघून तुमचे कान देखील टवकारलेच ना आणि डोळे देखील विस्फारले असतील. प्रेमाचा डायरेक्ट संबंध हृदयाशी आपण जोडतो. आणि प्रेमाच्या रोमँटिक हृदय कल्पनेत रमणारा माणूस हृदयाला जर थोडंफार काहीतरी झालं तर मात्र अचानक हादरून जातो. आपल्याला हृदयरोग झालाय हे समजल्यावर तो माणूसच काय, संबंध परिवार ढवळून निघतो. गांगरून जातो पुरता! आणि अशावेळी योग्य डॉक्टर आणि योग्य सल्ला नाही मिळाला तर अनर्थ ओढवण्याची शक्यता जास्त. पण आता घाबरायचं नाही कारण आता डॉ. शेखर आंबर्डेकर यांच्या 'ह्र्दयागोष्टी' या ऑडिओ बुक मधून आपल्याला हृदयाची हसत खेळत ओळख होणार आहे. गप्पागोष्टीतून आणि स्वतः च्या अनुभवातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. कै. डॉ. नीतू मांडके यांनी कौतुक केलेले हे पुस्तक जागतिक योगा दिवसानिमित्त ऑडिओ स्वरूपात आपल्या समोर येत आहे ते स्वतः डॉ. शेखर यांच्याच आवाजात. प्रत्येकाने ऐकावे असे हे ऑडिओ बुक.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399913
Release date
Audiobook: 21 June 2023
English
India