4.5
Biographies
मराठवाडा/ हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी घडलेला क्रांतिकारी संग्राम ऐतिहासिक असून नव्या पीढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असा आहे. दुर्दैवाने प्रस्थापित पुढाऱ्यांनी आर्यसमाजाने दिलेल्या महानतम योगदानाची दखल घेतली नाही. म्हणूनच आर्यक्रांतीकारकांचा गौरव करण्याचे औदार्य ते दाखवू शकत नाहीत, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील नक्षत्राप्रमाणे रणझुंजार व्यक्तिमत्व म्हणजे पंडित नरेंद्रजी हे होत ! निजामाच्या जुलमी राजवटीत सामान्य जनतेवर फार मोठे अत्याचार झाले. रझाकारी अत्याचाराने हिंदू समाज अत्यंत भयभीत झाला होता. जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचे षड्यंत्र आणि सतत होणारा अनन्वित छळ यामुळे कंटाळलेल्या जनतेने उठाव केला. यात आर्यवीरांनी मोठ्या शौर्याने उडी घेतली. या क्रांतीलढ्यात आघाडीवर असणाऱ्या आर्यनेत्यांपैकी पं. नरेन्द्रजी हे एक धीरोत्तम युगपुरुष! मॅझिनी आणि गॅरीबाल्डीप्रमाणे त्यांचे कार्य होते. समाजातील वाढत जाणाऱ्या अन्याय आणि अज्ञान या दोन्ही विरुद्ध त्यांनी मोठा संघर्ष केला. सामान्य लोकांना निजामी राजवटीविरुद्ध पेटून उठण्यासाठी प्रेरणा दिली. तसेच महर्षि दयानंद सरस्वती स्थापित आर्यसमाजाच्या वैदिक सिद्धांताच्या प्रचार आणि प्रसाराचेही अतुलनीय असे कार्य केले. या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व वाहिले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगून त्यांना अनेकदा तुरूंगात जावे लागले. आर्यसत्याग्रह करतांना अनेक हाल अपेष्ठा सहन केल्या. पण त्यांनी धीर खचू दिला नाही. आर्यसमाजाचे नेतृत्व करून तरुणांना प्रेरणा दिली. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने दक्षिणकेसरी आणि तत्कालीन युवकांचे हृदयसम्राट बनले.
अशा थोर क्रांतीवीराच्या जीवन व कार्यापासून मात्र आजची पिढी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. पं. नरेंद्रजींची हृदयस्पर्शी जीवनगाथा मराठी वाचकांसमोर आणण्याचे कार्य नांदेडचे तळमळीचे आर्यबंधू श्री. नारायणराव कुलकर्णी यांनी केले आहे. पं. नरेंद्रजींच्या * 'जीवन की धूप छांव' * या हिंदीतील आत्मचरित्राचा मराठीत सुगम अनुवाद करून त्यांनी एक प्रकारे क्रांतीपर्वाचा जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला आहे. त्यांनी अनुवादित केलेली ही आत्मकथा आता स्टोरीटेलवर उपलब्ध होत असून ती तरूणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल आणि त्यांचे जीवन योग्य दिशेने जाण्यास साह्य होईल असा विश्वास आहे.
जयहिंद 🇮🇳
*॥ आजादी का अमृत महोत्सव ॥ *
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399852
Translators: Narayan Kulkarni
Release date
Audiobook: 24 June 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 4 ratings
Cozy
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 4
अरुण
26 Mar 2024
त्याग आणि समर्पित वृत्त्ती ने कार्य केल्यास फळ हे तर मिळतेच. त्यांच्या कार्याचा मी सदैव आदरच करतो,.
English
India