Step into an infinite world of stories
5
Biographies
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान क्रांतिकारी हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल यांच्या आत्मकथेचा हा मराठी अनुवाद आमच्या राष्ट्रीय आंदोलनावर प्रकाश टाकणारा आहे. हे एक प्रामाणिक पुस्तक आहे.
कोणत्याही देशाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या श्रीमंतीवर अवलंबून नसते. त्या देशात किती कारखाने आहेत यावरही अवलंबून नसते. त्या देशातील नद्या, तळी, पर्वत यांमुळेही त्या राष्ट्राचा शोभिवंतपणा दिसून येत नाही तर कांही राष्ट्रे अशी आहेत, की त्यांच्या अवनतीच्या काळातसुद्धा कांही तत्त्वज्ञ, कवी, लेखक कलाकार जन्माला आले, अशा महनीय व्यक्तींवर देशाचे श्रेष्ठत्व अवलंबून असते.
हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अनमोल रत्न आहे. ही विश्वसाहित्यातील महत्त्वपूर्ण कृती आहे. ही हिंदी साहित्यातील सर्वश्रेष्ठ आत्मकथा आहे, की जी एका क्रांतिकारकाने स्वतः फाशीच्या कोठडीत बसून लिहिलेली आहे. फाशीचा दोर गळ्यात पडण्याच्या तीन दिवस अगोदर ही आत्मकथा पूर्ण करून मृत्युंजयी रामप्रसाद बिस्मिल यांनी तिला सुरक्षित बाहेर पाठवून दिले.
ही आत्मकथा प्रकाशित झाल्याबरोबर इंग्रजांचे धाबे दणाणले. ते थरथर कापू लागले. ते छापून आल्याबरोबर इंग्रजांनी त्याच्यावर बंदी आणली. पण क्रांतिवीरांनी नावे बदलून, त्यांची प्रकाशने करून देशातील थंड रक्ताच्या लोकांच्या नसा-नसांतून नवीन उसळते रक्त तयार केले. हे पुस्तक फार्शी लिपीमध्येसुद्धा छापलेले आहे. त्यावरसुद्धा इंग्रजांनी प्रतिबंध लावला. या पुस्तकाने अनेक तरुणांना मातृदेवीच्या चरणी प्राणार्पण करण्याची प्रेरणा दिली. साहित्यिक दृष्टिकोनातूनही ही कथा एक असाधारण कृती आहे. वीर रामप्रसादजींचे गद्य आणि पद्य या दोन्हीवर सारखेच प्रभुत्व होते. ते हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांतील उच्चकोटीचे कवी होते.
मेरा रंग दे बसंती चोला, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है यासारखी अजरामर देशभक्तीपर गीते रामप्रसाद बिस्मिल यांनीच लिहिली आहेत.
ही आत्मकथा तरूणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल आणि त्यांचे जीवन योग्य दिशेने जाण्यास साह्य होईल.
जयहिंद 🇮🇳 ॥ आजादी का अमृत महोत्सव ॥
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399883
Translators: Narayan Kulkarni
Release date
Audiobook: 8 June 2023
English
India