Step into an infinite world of stories
4.2
Personal Development
तिसरा चमत्कार समजण्यापूर्वी संपूर्ण ज्ञानाचे चार आयाम समजूया. पहिला आयाम - आसनायाम, दुसरा आयाम - प्राणायाम, तिसरा आयाम-विचारायाम, चौथा आयाम - मौनायाम. विचारांचा तिसरा आणि चौथा आयाम, जो विचारसूत्र आणि मौनमंत्राच्या रूपात या पुस्तकात प्रस्तुत केला आहे, त्याचा उपयोग करून आपण निर्मळ मन, प्रशिक्षित शरीर, उपजिविका लक्ष्य, आदर्श वजन, दीर्घायुष्य, चांगले मित्र, कलाकौशल्य, निरोगी जीवन, योग्य जीवनसाथी आणि पृथ्वीलक्ष्य प्राप्त करू शकता.
आपला एक सशक्त विचारदेखील विश्वाला नवीन दिशा देऊ शकतो. काय म्हणता, ‘हे कठीण आहे.’ तर मग निश्चितच हे पुस्तक वाचणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. पुस्तक वाचल्यानंतर उद्दिष्टपूर्ती सहज, सुलभ होऊन विचारांचा तिसरा आयाम म्हणजे विचारनियमापर्यंत आपण पोहोचला असाल.
आपण आधीपासूनच आशावादी दृष्टिकोन ठेवत असाल तर हे पुस्तक आपल्यासाठी परमसंतुष्टीचं कारण बनेल. प्रत्येक समस्येचं निरसन आपल्या अंतर्यामीच आहे यावर विश्वास ठेवा. या विश्वासासह हे पुस्तक वाचायला आरंभ करा. सकारात्मक परिणामांवर आणि आपल्या यशस्वीतेवर विश्वास ठेवा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि या पुस्तकाचं ज्ञान असेल तर तिसरा चमत्कार तुमच्यासाठी सहज शक्य आहे.
चला तर मग ‘विचारायाम’चा जो पूल आहे... तो लीलया पार करून मौनाचा साक्षात्कार करूया... कुठे? महानंदाच्या साम्राज्यात...!
© 2020 WOW Publishings (Audiobook): 9788184156980
Release date
Audiobook: 19 March 2020
English
India